शिक्षणाच्या माध्यमातून सेवा हीच वडिलोपार्जित ठेव : हास्य कवी अशोक नायगावकर

Edited by:
Published on: January 28, 2025 19:03 PM
views 60  views

दोडामार्ग : काँक्रीटच्या इमारतीपेक्षा कौलारू नळ्यांच्या इमारती मला फार आवडतात. अशा इमारतीत मला खूप समाधान मिळतं . प्रसन्नता वाटते. हेच माझं सुख आहे परंतु मराठी माध्यमिक शाळा टिकवणे फार कठीण झाले आहे. नूतन विद्यालयाचा दर्जा उंचावण्यासाठी संस्थाध्यक्ष प्राचार्य मोहनराव देसाई, संस्था सचिव गणपतराव देसाई व संस्था सदस्य विविध उपक्रम राबविताना दिसतात आम्ही मोठ मोठ्या शहरांमध्ये कार्यक्रम घेऊन मराठी भाषा टिकवण्याचे कार्य करीत आहोत. तसेच तेच कार्य नूतन विद्यालय करीत आहे. संस्था चालकांचे व्यवसाय चांगले आहे त्या व्यवसायातून ते आपल्या कुटुंबाचा चांगल्या प्रकारे उदारनिर्वाह करू शकतात. परंतु आपल्या वाढवडिलांनी आपल्याजवळ सोपवलेल्या शिक्षणाचा ठेवा टिकून ठेवण्याचे कार्य संस्था अध्यक्ष प्राचार्य मोहनराव देसाई,  सचिव गणपतराव देसाई करीत आहेत हे त्यांचे कार्य कौतुकास्पद तसेच आदरणीय असल्याचे कवी नायगावकर म्हणाले.

 कळणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ  कळणे संचलित  नूतन विद्यालय कळणे या प्रशालेत मराठी साहित्यसृष्टीतील काही  ताऱ्यांनी आज नूतन विद्यालय कळणे प्रशालेत काव्यमैफिल सजवली.' मराठी आठव दिवस ' या कार्यक्रमात आपल्या नम्रविनोदी शैलीच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांवर भाष्य करत उपरोधाचा आसूड ओढणारे ज्येष्ठ हास्य कवी अशोक नायगावकर यांनी आपल्या खुमासदार शैलीत मानवी जीवनाशी संबंधित विविध प्रश्नांवर मिशिकलतेने भाष्य करत आपल्या कविता सादर केल्या. त्याच्या सोबत  लेखक सतीश पाटणकर, कवी इंद्रनिल घुले, रजनीश राणे, संस्था सचिव  गणपत देसाई, नकुल पार्सेकर, कोकणसादचे संपादक संदीप देसाई  आदी मान्यवर उपस्तित होते.

 यावेळी त्यांनी ' वांग ' ही कविता सादर करून रसिकांची विशेष दाद मिळवली. सुप्रसिद्ध सामना चित्रपटाचे दिग्दर्शक , विडंबन कवी , वात्र टीकाकार , चित्रपट दिग्दर्शक रामदास फुटाणे यांनी सामाजिक प्रश्नांवर भाष्य करत, गोरगरीब व खेडूत लोकांच्या मनात सरणारे दुःख आपल्या कवितेच्या माध्यमातून रसिकांसमोर मांडले. गीतकार कवी अशोक बागवे यांनी आपल्या गीतांचे गायन करून रसिकांची दाद मिळवली.' चार दिवस सासूचे ' या आपल्या मालिका गीताची निर्मितीची कहाणी उलगडून दाखवली यावेळी इंद्रनील घुले या कवींनी ' लग्नातील जेवण ' ही प्रेमावरची भन्नाट कविता सादर करून रसिकांची दाद मिळवली.

ही काव्यामैफिल ऐकण्यासाठी दोडामार्ग तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर , पत्रकार कळणे पांचक्रोशितील महिला व इतर नागरिक उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राच्या या लोकप्रिय कवींचा संस्थेचे सचिव मा. श्री. गणपतराव देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक उमेश देसाई यांनी तर सूत्रसंचालन शिक्षक सतीश धर्णे तर आभार निकिता सावंत यांनी मानले.