व्यावसायिक एलपीजी वाटपासाठी PNG (Piped Natural Gas) जोडणी आवश्यक

सिंधुदुर्गातील ग्राहकांना अर्ज करण्याचे आवाहन
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: March 27, 2026 19:53 PM
views 24  views

सिंधुदुर्गनगरी : केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या प्राप्त निर्देशानुसार, व्यावसायिक एलपीजी (Commercial LPG) वाटपाबाबत सर्व राज्यांच्‍या मुख्य सचिवांना महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत.त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक/औद्योगिक (हॉटेल, ढाबे, उपहारगृहे, औद्योगिक कॅन्‍टीन, अन्‍न प्रक्रिया / दुग्‍धव्‍यवसाय, सामुदायिक स्‍वयंपाकघरे इ.) एलपीजी (Commercial )  ग्राहकांना सूचित करण्यात येते की, व्यावसायिक एलपीजीच्या एकूण 50% वाटपातून पात्र होण्‍यासाठी संबंधित ग्राहकांनी प्रथम या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या City Gas Distribution (CGD) संस्थेकडे Piped Natural Gas (PNG) जोडणीसाठी अर्ज करण्‍यास पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या २७ मार्च २०२६च्या पत्रान्वये सुचवले आहे. त्‍याकरिता  ग्राहकांनी खालील दिलेल्‍या नंबरवर अथवा कंपनीकडे संपर्क साधावा. 

Address – 

 Maharashtra Natural Gas Limited, Shree Saikala, House No- 3192,

 Opp. Nakshatra Nagari, Sangirdewadi, Kudal,  Tal. Kudal,

Dist.- Sindhudurg   Pin Code – 416 520.

Contact number – 7588090505/ 9890743547

Email- crmsindhudurg@mngl.in

तरी जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांनी वरील दिलेल्‍या पत्‍त्‍यावर PNG जोडणीसाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्‍हा प्रशासन सिंधुदुर्ग यांच्‍याव्‍दारे करण्यात येत आहे.