खेळाडूंचा प्रांताधिकारी जगदिश कातकर यांच्‍याकडून सत्‍कार

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 26, 2025 20:03 PM
views 262  views

देवगड : देवगड तहसील मधील खेळाडूंचा प्रांताधिकारी जगदिश कातकर यांच्‍याकडून सत्‍कार करण्यात आला आहे. राज्‍यस्‍तरीय  व कोकण विभागीय क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धेत देवगड तहसील मधील कर्मचारी वर्गातील खेळाडुंनी सहभाग घेत घवघवीत यश संपादित करून स्‍पर्धेत वेगळा ठसा उमठवला होता. यामध्‍ये सहायक महसूल अधिकारी, महसूल सेवक ग्राम महसूल अधिकारी, ग्राम महसूल सेवक, मंडळ अधिकारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवत प्रत्‍येक क्रीडा प्रकारात यश संपादीत केले होते.

आपल्‍या कार्यालयातील खेळाडू कर्मचारी वर्गाला भावी काळात प्रोत्‍साहन व इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी तहसिलदार रमेश पवार यांनी आपल्‍या दालनात प्रांताधिकारी श्री. कातकर यांच्‍या हस्‍ते सुचितत्रा आडारकर सहायक महसूल अधिकारी, ग्राममहसूल अधिकारी नेहा देवगडे,समिक्षा राणे, प्रियांका डवरे, विपश्‍यना डिगे, अजिंक्‍य महाले, दिपेश सांगळे, सनी बोटे, अशोक जपे, पांडूरंग वंजारे, श्रीकांत जाधव, विनायक शेटये, प्रमोद आचरेकर, प्रणित सावंत, प्रमोद वाले आदी खेळाडूंचा सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी प्राताधिकारी कातकर यांनी खेळाडू कर्मचारी यांना यापूढेही सातत्‍यपूर्ण सराव करून असेच यश संपादन करा असे आवाहन केले. सत्‍कार कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक तहसीलदार रमेश पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदिप कदम यांनी केले. यावेळी मंचावर तहसीलदार रमेश पवार, नायब तहसीलदार श्रीकृष्‍ण ठाकूर आदी उपस्थित होते.