आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात वृक्षारोपण

Edited by: दिपेश परब
Published on: June 13, 2023 19:27 PM
views 89  views

वेंगुर्ला : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने येथील नगरपरिषद स्टेडियम नजीक पोस्ट ऑफिस समोर व बॅ बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. 

यावेळी सर्वप्रथम युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शाखेत केक कापून आदित्य ठाकरे यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर येथील नगरपरिषद स्टेडियम नजीक पोस्ट ऑफिस समोर मुख्याधिकारी परितोष कंकाळ  व तालुकाप्रमुख यशवंत परब यांच्या हस्ते व बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात प्राचार्य डॉ. विलास देउलकर, उद्यानविद्या विभाग प्रमुख प्रा. विरेंद्र देसाई यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थ्यांच्या वतीने संपूर्ण परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. खर्डेकर महाविद्यालयात आदित्य ठाकरे यांचा ३२ वा वाढदिवस असल्याने विद्यार्थ्यांमार्फत ३२ झाडे लावण्यात आली. तसेच तालुक्यात विविध भागात सुद्धा अशाच प्रकारे पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमार्फत वृक्षारोपण करण्यात आल्याचे तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी सांगितले. 

यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख यशवंत परब, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, युवासेनाप्रमुख पंकज शिरसाट, शहरप्रमुख अजित राऊळ, महिला तालुका संघटिका सुकन्या नरसुले, शहर समन्वयक विवेक आरोलकर, संजय गावडे, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, वायंगणी सरपंच सुमन कामत, युवासेनेचे राधाकृष्ण पेडणेकर, कौशल मुळीक, वैभव फटजी, वेदांत वाडेकर, श्रीकृष्ण बांदवळकर, रफिक बेग, उमेश नाईक, बापू वेंगुर्लेकर, राजश्री मर्ये, रश्मी गावडे, श्रीधर पंडित, गजानन गोलतकर, अशोक नाईक, संदीप केळजी, कोमल सरमळकर, लक्ष्मी पेडणेकर, उर्मिला निरवडेकर आदी उपस्थित होते.