सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचं वृक्षारोपण !

Edited by: विनायक गांवस
Published on: June 26, 2024 09:53 AM
views 77  views

सावंतवाडी : झाडांमुळे आपल्याला शुद्ध प्राणवायू मिळतो. फळे देणारी झाडे शरीराला लागणारी जीवनसत्वे देतात. झाडांमुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. निसर्गाचे चक्र सुरळीत सुरू राहतात. त्यामुळे झाडे लावा आणि त्यांना जगवा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून निरवडे येथे बोलत होते.


सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि आजगाव वनपरिमंडल यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला यावेळी जांभूळ सुरू आणि वड, जांभूळ,सुरू आदीवृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. सुमारे शंभरहून अधिक झाडे यावेळी वनविभागाच्या जमिनीमध्ये लावण्यात आली. यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमांमध्ये राज्य मराठी पत्रकार परिषदेचे माजी राज्याध्यक्ष गजानन नाईक सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार आजगाव वन परिमंडळ अधिकारी पृथ्वीराज प्रताप, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे,डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर,  माजी तालुकाध्यक्ष विजय देसाई तालुका पत्रकार संघाचे खजिनदार रामचंद्र कुडाळकर कार्यकारणी सदस्य नरेंद्र देशपांडे तसेच पाडलोस वनरक्षक अप्पासो राठोड इन्सुली वनरक्षक संग्राम पाटील,पाडलोस वनसेवक चंद्रकांत पडते आदी उपस्थित होते.


वड वृक्ष लावण्याची पद्धत त्याच्यापासून मिळणारे फायदे याची माहिती माजी अध्यक्ष विजय देसाई यांनी दिली. यावेळी जांभूळ वृक्षाचे महत्त्व आणि फायदे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी सांगितले. तर वृक्ष लागवडीमध्ये अभिमन्यू लोंढे अमोल टेंबकर नरेंद्र देशपांडे यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी तर वनविभागाच्या वतीने पृथ्वीराज प्रताप यांनी आभार व्यक्त केले.