लोरेतील मंदिर परिसरात २०० हुन अधिक झाडांच्या रोपांचे वृक्षारोपण

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 24, 2023 19:20 PM
views 127  views

कणकवली : लोरे नं. १ ग्रामपंचायतच्यावतीने श्री देव गांगोचाळा देवालय मंदिर परिसरात विविध अशा २०० झाडांच्या रोपांचे वृक्षारोपण माजी सभापती मनोज रावराणे आणि लोरे सरपंच अजय रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. 

श्री देव गांगोचाळा देवालय मंदिर परिसरात पर्यटन विकास मंडळाच्या माध्यमातून सुशोभीकरण करण्यात आले आहे. मंदिर परिसरामध्ये विविध अशा फुल झाडांची ही लागवड करण्यात आली. यामध्ये आवळा, रतांबे, काजू, बेल, चंदन, वड अशा प्रकारच्या सुमारे २०० रोपांची लागवड करण्यात आली. तसेच झेंडू सह अन्य फुल झाडांची लागवड करण्यात आली आहे. श्री देव गांगोचाळा देवस्थान जागृत असून या ठिकाणी दर दिवशी शेकडो भाविक पर्यटक धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी येत असतात. त्याचप्रमाणे हा परिसर सुशोभीकरण करून तालुक्यातील एक धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जात आहे. यावेळी उपसरपंच सुमन गुरव, ग्रामसेवक ऋतुराज कदम, ग्रामस्थ सुनील रावराणे, नरेश गुरव, मनोहर गुरव, सचिन सावंत, विशाल खाडये,संजय खाडये,दयानंद गुरव, तुषार रावराणे, सुमित रावराणे,किशोर गुरव, सागर गुरव, कृष्णा गुरव, संतोष मोसमकर, विजय गुरव, राजेंद्र गुरव आदी वृक्ष लागवडीसाठी सहभागी झाले होते.