
देवगड : देवगड कुणकेश्वर समुद्र किनाऱ्यावर महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती व कुणकेश्वर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कुणकेश्वर समुद्र किनाऱ्यावर वृक्षारोपण करण्यात आले.कुणकेश्वर समुद्रकिनाऱ्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने सुरूच्या रोपांची लागवड यावेळी करण्यात आली. या उपक्रमाचा शुभारंभ देवगड पंचायत समिती गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता कुणकेश्वर बीच येथे करण्यात आला.
महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समितीच्या वतीने वाढती ग्लोबल वार्मिंगची समस्या लक्षात घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात ५० हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे.त्यानुसार या उपक्रमाची सुरुवात जगप्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर समुद्रकिनारी वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात ३०० झाडे लावण्यात आली. यामध्ये सुरु, वड व पिंपळ अशी झाडे आहेत.
या वृक्षलागवड कार्यक्रमावेळी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन जाधव, कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर, सहाय्यक गटविकास अधिकारी गवळी, कृषी अधिकारी दिगंबर खराडे, अभिजीत मदने, कुणकेश्वर ग्रामसेवक गुणवंत पाटील, केंद्रप्रमुख तथा जिल्हा नेते अशोक जाधव,केंद्रप्रमुख स्नेहा पारकर, देवगड तालुकाध्यक्ष आनंद जाधव,महिला प्रतिनिधी संगीता जाधव, जिल्हा सरचिटणीस प्रकाश वाडकर अखिल संघाचे धर्मराज धुरत, मधुसूदन घोडे, देवीदास माने,उपसरपंच शशिकांत लब्दे, ग्रा प सदस्य ,संजय आचरेकर, एकनाथ तेली,डॉ मांडवकर, महेश तेली, भास्कर पेडणेकर, सुजित बोंडाळे, विलास लोके,अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी, व ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.