
सावर्डे : राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षण सप्ताह अंतर्गत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 27 जुलै रोजी इको क्लब च्या वतीने प्लांट फॉर मदर या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांना मातेसह धरणीमातेबद्दल आदर निर्माण व्हावा म्हणून आई व विद्यार्थ्यांनी एकत्रित वृक्षारोपण केले. यामुळे विद्यार्थ्यांच्या मध्ये पर्यावरण पूरक संकल्पनांची जाणीव जागृती निर्माण होण्यास मदत झाली. विद्यार्थी जलसंवर्धन, वृक्ष संवर्धन, ऊर्जा संवर्धन व कचरा व्यवस्थापन यासाठी सक्षम व्हावा हा या इको क्लबचा मुख्य उद्देश आहे. शासकीय परिपत्रकानुसार वर्षभरामध्ये करण्यात येणाऱ्या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन या इको क्लबच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
याच दिवशी विद्यार्थ्यांसह आई यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षरोपण करून उस्फुर्त प्रतिसाद दिला. विद्यालयाच्या वृक्षारोपण कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उप प्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर, उद्योजक अभिषेक सुर्वे, व्हेळेचे सरपंच रोहित गमरे, सावर्डेच्या सरपंच समीक्ष बागवे,सदस्या नेहा मिस्त्री एमसीव्हीसी विभाग प्रमुख सलीम मोडक सर्व शिक्षक व विद्यार्थी पालक उपस्थित होते.