सावंतवाडी शिवसेना कार्यकारिणीची उद्या नियोजन बैठक

Edited by: विनायक गावस
Published on: January 28, 2024 13:03 PM
views 76  views

सावंतवाडी : शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ०४ फेब्रुवारी २०२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुका शिवसेना कार्यकारिणीची नियोजन बैठक सोमवार २९ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११. ०० वाजता आदिनारायण मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीला जिल्हा संपर्क उपनेते अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, उपनेत्या जान्हवी सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख. शैलेश परब, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार हे उपस्थित राहणार आहेत.

यावेळी शिवसेना, युवा सेना व महिला आघाडी च्या सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख व शाखाप्रमुख, सरपंच, इतर प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन उबाठा शिवसेना तालुखा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केले आहे.