
देवगड : माध्यमिक शालांत परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षांमध्ये मध्ये देवगड इंग्लिश मिडीयम स्कूलचा पियुष राठोड 98.80 टक्के गुणांसह तालुक्यात प्रथम आला असून देवगड हायस्कूलची सारा खान द्वितीय ,तर जामसंडे हायस्कूलची लोचन भगत व किंजवडे हायस्कुलची आर्या जोईल 97 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
देवगड तालुक्यातील 21 हायस्कूलांचा निकाल 100 टक्के लागला असून किंजवडे हायस्कुलची सलग 17 वर्षे 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवण्यात हायस्कूल ला यश मिळाले आहे.
माध्यमिक शालांत परिक्षेचा देवगड तालुक्याचा निकाल 98.52 टक्के लागला असुन तालुक्यातील 32 हायस्कूलांपैकी 21 हायस्कुलांचा निकाल 100 टक्के लागला आहे.उमा मिलींद पवार देवगड इंग्लिश मिडीयम स्कूल या प्रशालेचा विद्यार्थी पियुष सुनिल राठोड 98.80 टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम तर शेठ म.ग.हायस्कूल देवगडची विद्यार्थीनी सारा जावेद खान ही 98.60 टक्के गुण मिळवून द्वितीय व जामसंडे श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कुलची विद्यार्थीनी लोचन भगत व आदर्श विद्यामंदीर किंजवडे या हायस्कूलची विद्यार्थीनी कुमारी आर्या जोईल यांनी 97 टक्के गुण मिळवुन तालुक्यात तृतीय क्रमांक पटकाविला आहे. परीक्षेला एकूण 1354 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी 1334 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विशेष श्रेणीत 372, प्रथम श्रेणीत 525, द्वितीय श्रेणीत 353 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.