जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत पिंगुळी रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ प्रथम

Edited by: विनायक गांवस
Published on: August 19, 2024 13:38 PM
views 147  views

सावंतवाडी : कोलगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत पिंगुळीच्या श्री रवळनाथ प्रासादिक भजन मंडळाने (रुपेश यमकर) प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत वैभववाडीच्या श्री दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळाने (विराज तांबे) द्वितीय क्रमांक तर पिंगुळीच्या  तृतीय क्रमांक श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळाने ( प्रसाद आमडोसकर) तृतीय क्रमांक पटकाविला.

 स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे उत्तेजनार्थ प्रथम  श्री स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ (तांबोळी) अमित तांबोळकर, उत्तेजनार्थ द्वितीय - श्री मूळपुरुष प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) श्री पुरुषोत्तम परब, उत्कृष्ट गायक - विराज तांबे श्री दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळ (वैभववाडी), उत्कृष्ट पखवाज वादक - प्रथमेश राणे श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ (पिंगुळी), उत्कृष्ट हार्मोनियम - विश्राम घाडी श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ (श्रावण), उत्कृष्ट झांज वादक - रोशन गवस श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ (पाडलोस), उत्कृष्ट कोरस -श्री रुपेश यमकर  श्री रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ (पिंगुळी) स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळ्याला सातेरी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष चंदन धुरी, माजी पंचायत समिती सदस्य मेघश्याम काजरेकर, स्पर्धेचे परिक्षक शहाजान शेख गुरुजी, बुवा मोहन मेस्त्री, सामाजिक कार्यकर्ते  विनायक ठाकूर, राजन म्हापसेकर, माजी सरपंच  संदीप हळदणकर, संजु धुरी, प्रकाश धुरी, भजनी बुवा अनिल पांचाळ, सुरेश राऊत, आनंद धुरी आदी उपस्थित होते. कोलगाव श्रीदेवी सातेरी मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेच्या दोन्ही दिवशी सिंधुदुर्गातील नामांकित ११ भजन मंडळानी आपले दर्जेदार सादरीकरण करत स्पर्धेत रंगत आणली. या स्पर्धेत अनेक नामांकित भजनी बुवा ही हजेरी लावली होती. निमंत्रिताच्या या स्पर्धेला भजन रसिकांचाही अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला. प्रसिद्ध निवेदक राजा सामंत यांच्या या भजन स्पर्धेच्या उत्कृष्ट सुत्रसंचालन आणि निवेदनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.