२९ डिसेंबरला पिकुळेत आरोग्य तपासणी शिबीर

Edited by:
Published on: December 27, 2024 19:00 PM
views 26  views

दोडामार्ग : साण्डू फार्मास्यूटीकल्स लिमिटेड आणि व्यंकटेश आयुर्वेदिक औषधालय व सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळ पिकुळे तर्फे आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिर रविवार दि. २९ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर पिकुळे लाडाचेटेंब धालोत्सव रंगमंच येथे होणार आहे. या शिबिरामध्ये ॲलर्जी, पचनाच्या समस्या, पक्षाघात वात विकार, भगंदर, स्त्रीरोग, त्वचाविकार, हाडांचे व सांध्याचे आजार, मूळव्याध, बालरोग, अन्य जुनाट विकार आदी व्याधीवर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व चिकित्सा केली जाणार आहे. तरी हा शिबिराचा लाभ अनेकांनी घ्यावा असे आवाहन ग्रा. पं. सदस्य रत्नदीप गवस यांनी केले आहे.