
देवगड : समग्र शिक्षा अंतर्गत भारतीय शिक्षण समागम निमित्त देवगड येथे मार्गदर्शन शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. भारतीय शिक्षण समागम (ABSS) 2025' च्या पार्श्वभूमीवर समग्र शिक्षा अंतर्गत देवगड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी फिजिओथेरपी व मार्गदर्शन शिबिर गटविकास अधिकारी अरुण चव्हाण व गटशिक्षणाधिकारी श्री. मुकुंद शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
या शिबिरात एकूण 16 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. या शिबिरात डॉ. श्रीम. स्पृहा अभिषेक गोगटे (फिजिओथेरपी सेंटर, देवगड) यांनी विद्यार्थीना फिजिओथेरपी दिली. व आवश्यकतेनुसार पालकांना उपयुक्त मार्गदर्शन केले.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी गट साधन केंद्र देवगडचे विशेष तज्ज्ञ सुदाम जंजाळ, नागोजी आवडणकर, विशेष शिक्षक योगेश डोईफोडे, दत्तात्रय घाडी, मंगेश आरेकर व भाऊराव गायकवाड यांनी सहभाग घेतला.