फुले - आंबेडकर, कर्मवीर यांनी शाळांसाठी भीक मागितली !

चंद्रकांत पाटलांच्या विधानाने गदारोळ
Edited by: ब्युरो
Published on: December 09, 2022 19:14 PM
views 384  views

पैठण : महाराष्ट्रातील महापुरूषांबद्दल मागील काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांकडून वादग्रस्त विधाने केली जात आहेत. यावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता भाजपचे नेते आमदार चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं असून यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडं भीक मागितली, असं विधान त्यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर याबद्दल तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. चंद्रकांत पाटील हे पैठण येथील एका कार्यक्रमात बोलत होते.