
सावंतवाडी: व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल - सावंतवाडी येथील डि फार्मसी पदविका अभ्यासक्रमाचा निकाल 90.90% लागला आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालाची परंपरा कायम राखुन नेत्रदीपक कामगिरी केली.
शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील पदविका अभ्यासक्रमातील द्वितीय वर्षातील प्रथम क्रमांक कुमारी संध्या विश्वास कांबळे(84.18%), द्वितीय क्रमांक कुमारी साक्षी रामचंद्र गवस (82.27%), तृतीय क्रमांक कुमारी निकिता शंकर धुरी( 82.18%) यांनी पटकावला.
उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखल्याबद्द्ल महाविद्यालयाचे तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे आधारस्तंभ व प्रेरणास्थान व माजी कुलगुरू डॉ.वेदप्रकाश पाटिल, संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार डॉ.राहुल पाटील यांनी अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे प्रशासकीय अधिकारी पंकज पाटील, प्राचार्य डॉ.सुनील शिंगाडे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.