पी.एफ. डॉन्टस यांचे कार्य पुढे घेऊन जाणं हीच श्रद्धांजली

ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचे भावोद्गार
Edited by: विनायक गावस
Published on: October 14, 2023 18:14 PM
views 75  views

सावंतवाडी : पी.एफ. डॉन्टस हे माझे खास सहकारी होते. शिक्षण, सहकार आणि राजकारणात ते अतिशय तज्ञ होते. त्यांनी व मी मिळून अनेक संस्था स्थापन केल्या आणि त्या संस्था नावारूपाला आणल्या. माझे सच्चे मित्र डॉन्टस आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे कार्य असेच पुढे चालू ठेवणे, हिच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे भावनिक उद्गार माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी काढले.सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे आज डॉन्टस यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत बोलत होते. 


मला घडवणारा माझा गुरु व माझे पितृतुल्य व्यक्तिमत्व पी. एफ्. डॉन्टस यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी जे महान कार्य केले आहे, त्या कार्याचा रथ आपण सर्वजण मिळून पुढे नेऊया असे यावेळी सैनिक स्कूलचे सचिव सुनील राऊळ म्हणाले.यावेळी संस्थेचे सचिव सुनील राऊळ, सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर, सैनिक स्कूलचे कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, प्राचार्य एन. डी. गावडे, शिक्षक वर्ग व कर्मचारी उपस्थित होते.