सहकाररत्न पी .एफ. डान्टस यांची शोकसभा उद्या सावंतवाडीत

Edited by: देवयानी वरसकर
Published on: October 11, 2023 17:02 PM
views 86  views

सावंतवाडी : सहकार, सामाजिक ,राजकीय अशा क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी केलेले बहुआयामी व्यक्तिमत्व, आजी माजी सैनिकांचे नेते सहकाररत्न पी .एफ. डान्टस यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या गुरुवार 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सावंतवाडी नवसरणी जेलच्या मागे नवसरणी केंद्रामध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. पी.एफ. डान्टस मित्र मंडळ व विविध संस्था यांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री डान्टस यांनी देशसेवेसाठी काम केले होते .ते सेवा करून आल्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावी येऊन आजी-माजी सैनिकांना एकत्र करून सैनिकांची संघटना उभी केली. आणि त्याचबरोबर सैनिकांची पतसंस्था उभी केली. या माध्यमातून तरुण-तरुणींना व सैनिकांच्या पाल्यांना रोजगार, नोकरीची संधी उपलब्ध झाली. या माध्यमातून हजारोंना रोजगार मिळाला आहे. तसेच आंबोली येथे सैनिक स्कूलची स्थापना करून सैनिक घडवण्याच्या दृष्टीने त्याने विशेष प्रयत्न केलेत. साहसी खेळ अशा पद्धतीचे उपक्रम सुरू केलेत .कॅथलिक बँक सुरू केली .राज्य कर्मचारी पतसंस्था उभारली .पतसंस्थांच्या कर्ज वसुलीसाठी फेडरेशन सुरू केले.

सहकार ,शिक्षण, समाजकारण अशा माध्यमातून त्यांनी भरीव असे काम केले आहे. काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची विशेष ओळख होती .सैनिक संघटनेच्या महाराष्ट्र स्तरावर त्यांनी नेतृत्वही केले आहे.