
देवगड : देवगड समुद्रातील थरार खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या रत्नागिरीतील पर्ससीन नौके ने भर समुद्रात पेट घेतला. बचाव कार्यासाठी आजूबाजूच्या नौकांनी घेतलीधाव,कोस्टगार्डला मदतीसाठी पाचरण करण्यात आले राजीवाडा येथील अरफत फणसोपकर बोटीचे मालक खलाशांमध्ये वाद झाल्याचे म्हटले जाते, नुजहतअलीना या रत्नागिरीतील बोटीला समुद्रात आग लागली असून समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमार बोटीला खोल समुद्रात आग लागली आहे. आजूबाजूला बोटी नव्हत्या त्यामुळे खलाशांसाठी बचावाचे ही काही साधन नव्हते. एका बाजूने धुराचे लोट उठू लागले आणि बोट पाण्यामध्ये बुडू लागली. बचावासाठी आक्रोश करणाऱ्या खलाशांना जवळपास काहीच आधार दिसत नव्हता. जायचे तर जायचे कोठे? समुद्राच्या पाण्यात उड्या मारायच्या पण साधन काहीच नव्हते. तरीही मच्छीमार खलाशांनी आपली जिद्द सोडली नाही. देवाचे नाव घेत किंचाळ्या मारण्यास सुरुवात केली इतक्यात दुरून जाणाऱ्या एका नौकेने धूर पाहिला आणि बचावासाठी इतर नौकांना बोलावले पण जवळ जाता येईना कारण आग मोठी होती. समुद्रात धुराचे लोट उठले होते.