बांग्लादेशमध्ये हिंदू समाजावर अत्याचार

उबाठा शिवेसनेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Edited by:
Published on: December 09, 2024 15:09 PM
views 282  views

सिंधुदुर्गनगरी : बांग्लादेशामध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. तेथील मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. हिंदू महिलांवर देखील अमानविय पद्धतीने अत्याचार होत आहेत. हि बाब अत्यंत दुःखदायक असून सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या घटनेचा आम्ही निषेध करीत आहोत. केंद्र सरकार व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घेऊन बांग्लादेशामध्ये हिंदूंच्या मूलभूत मानवाधिकाराचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली.