
रत्नागिरी : बंदीच्या काळात मासेमारी करणाऱ्या पर्ससीन नेट नौका आणि एलईडी दिव्यांचा वापर करून मासेमारी करणाऱ्या नौका पकडून देण्याचा निर्धार रत्नागिरी तालुका शाक्षत पारंपारिक मच्छिमार संघटनेने मासिक सभेत केला आहे. 1 जानेवारीपासून शासनाच्या नियमानुसार पर्ससीन मासेमारीला बंदी आहे. तरीही आज अनेक पर्ससीन नेट नौका मिरकरवाडा बंदरात राजरोस मासेमारी करत आहे. या सर्व नौका मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्याना घेऊन पकडून देण्याचा निर्धार पारंपारीक मच्छिमारानी केला आहे. तसेच एलईडी दिव्याच्या सहाय्याने मासेमारी करणाऱ्या नौका पकडून देण्याचा निर्धार मच्छिमारांनी केला आहे.
हिवाळी अधिवेशनात आमदार भास्कर जाधव यानी पारंपारिक मच्छिमारांची बाजू मांडली. त्याबददल मच्छिमार संघटनेने त्यांचे अभिनंदन केले आहे. लवकरच पारंपारीक मच्छिमार शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांची भेट घेऊन बेकायदेशीर पर्ससीन नेट मासेमारी आणि एलईडी मासेमारीबददल तक्रार देणार आहेत.