
सावंतवाडी : एकाच ग्रामसेवकावर अनेक गावाचा कार्यभार देण्यात आल्यानं गावाच्या विकासाला ग्रामसेवकांला वेळ व न्याय देता येत नाही. त्यामुळे लोकांचे प्रश्न, समस्यांच निराकारण होत नाही. माजगाव गाव हे शहराच्या शेजारी असल्यानं ग्रामस्थांच्या अनेक समस्या आहेत. विकासासाला चालना मिळण्यासाठी माजगाव ग्रामपंचायतीस कायमस्वरूपी ग्रामसेवक द्यावा अशी मागणी माजगांव सरपंच डॉ.अर्चना सावंत व माजगाव ग्रामस्थांनी केली आहे.