
सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सह्याद्री शिक्षण संस्था सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित सावर्डे या पतसंस्थेने तंत्रज्ञानाचा नियमित व्यवहारांमध्ये अतिशय योग्य पद्धतीने वापर करून समाधानकारक प्रगती केली आहे. मात्र वर्गणी, शेअर्स या माध्यमातून पतसंस्था स्वयंपूर्णतेकडे गेली पाहिजे यादृष्टीने संचालक व सभासदांनी प्रयत्न करावा असे आवाहन करून सेवकांच्या सहकारी पतसंस्थेचे वर्षभरातील वाटचाल नाविन्यपूर्ण असून कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष श्री. शेखरजी निकम यांनी केले.
सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सह्याद्री शिक्षण संस्था सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित सावर्डे या पतसंस्थेची 60 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सह्याद्री शिक्षण संस्थेच्या गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली. या सभेसाठी संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूणचे आमदार श्री. शेखरजी निकम, सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड संचालक मारुतीराव घाग, श्रीमती आकांक्षा पवार, मानसिंग महाडिक,सेक्रेटरी महेशजी महाडिक, सुप्रसिद्ध चित्रकार व माजी प्राचार्य श्री. प्रकाश राजेशिर्के,सह्याद्री शिक्षण संस्थेचे सर्व संचालक, पतसंस्थेचे अध्यक्ष विजय काटे व सर्व संचालक, पतसंस्थेचे सेक्रेटरी श्री.नामदेव गावडे व सभासद उपस्थित होते.
सुरुवातीला संस्थेचे दिवंगत संचालक, कर्मचारी व वार्षिक कालावधीत दिवंगत झालेले सभासद, शहीद जवान यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पतसंस्थेचे चेअरमन विजय काटे यांनी सर्वांचे स्वागत केले. संस्थेचे संचालक श्री शैलेश सुर्वे यांनी प्रास्ताविक केले. स्व. गोविंदरावजी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेची स्थापना 1964 मध्ये झाली. अल्प ठेवीवर सुरू झालेल्या या पतसंस्थेने अल्पावधीतच प्रचंड मोठी झेप घेतली असून संस्थेस सालबादप्रमाणे 'अ'श्रेणी मिळाली आहे याची माहिती दिली. संस्थेच्या 2023-24 या अहवालास मंजुरी देणे, आर्थिक पत्रके वाचून मंजूर करणे, नफा वाटप मंजुरी देणे, हिशोब तपासणीसांच्या नियुक्तीस मंजुरी देणे, भाग भांडवल व्याजदर चर्चा व अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळेस येणाऱ्या विषयावर चर्चा करणे या सर्व सभेपुढील विषयावर चर्चा करण्यात आली. सर्व सभासदांच्या कर्जास विमा संरक्षण देणे,ठेवीची रक्कम वाढवून संस्था स्वावलंबी करणे, आपत्कालीन निधी संकलन करणे, यासारखे महत्त्वाचे निर्णय या वेळी घेण्यात आले. यावेळी अहवाल चालत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचे सन्मान करण्यात आले. त्याचबरोबर गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या पेटंट प्रकाशन बद्दल त्यांचे देखील सन्मान करण्यात आले. ज्या सभासदांची मुले अहवाल सालत दहावी बारावी उत्तीर्ण झाले त्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. शासनाच्या इयत्ता पाचवी व आठवी च्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जे विद्यार्थी गुणवत्ताधारक ठरले त्यांचाही यावेळी भेटू वस्तू देऊन गौरव करण्यात आला. या सभेचे निवेदन श्री. दादासाहेब पांढरे व श्री शिवलिंग सुपणेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सुलोचना जगताप यांनी केले