ग्रामपंचायतीतून लोकाभिमुख कारभार व्हावा : नासीर काझी

Edited by:
Published on: June 20, 2023 17:18 PM
views 78  views

वैभववाडी : ग्रामपंचायत हे गावच्या विकासाचे प्रथम दालन आहे.सर्वसामांन्यांचा थेट संबंध ग्रामपंचायतीशी येतो.त्यामुळे लोकाभिमुख कारभार या माध्यमातून व्हायला हवा असे मत भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी व्यक्त केले.

कोकिसरे ग्रामपंचायतीच्या नूतन वास्तूचे आज श्री काझी यांच्या  हस्ते उद्घाटन झाले .यावेळी व्यासपीठावर माजी सभापती अरविंद रावराणे, माजी जी. प.सदस्य .सुधीर नकाशे, माजी सभापती अक्षता डाफळे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब,सरपंच .अवधूत नारकर उपसरपंच लक्ष्मी म्हेतर, माजी सरपंच दत्ताराम सावंत,प्रकाश सुतार आदी उपस्थित होते.

काझी म्हणाले,या गावच्या विकास कामांसाठी आ.नितेश राणे यांनी मोठ्या प्रमाणावर निधी दिला.तालुक्यात सर्वाधिक निधी या गावाला उपलब्ध करून दिला आहे.अनेक विषय आ.राणे यांच्या माध्यमातून मार्गी लागले.भविष्यातही गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्व कटीबद्ध आहोत असा विश्वास श्री काझी यांनी दिला.

या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य प्रदीप नारकर, समिक्षा पाटणकर,नेहा नारकर,वसुधा आंब्रस्कर,सोनाली पवार,प्रमोद जाधव,वैशाली कुडाळकर,ग्रामसेवक संभाजी वाघमोडे,दाजी पाटणकर,दिनेश भिसे,विनोद आयरे,अनंत नेवरेकर,ग्रा. प.कर्मचारी सूर्यकांत नेवरेकर,वैष्णवी नकाशे, विनोद जाधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.