
सावंतवाडी : प्रदेश राष्ट्रवादी महिला पदाधिकारी बैठक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे, महिला प्रदेशाध्यक्षा अँड. रोहिणी खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांची या बैठकीस उपस्थित होती. या बैठकीत संघटनात्मक बांधणीसह इतरबाबींचा आढावा घेण्यात आला.
कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब म्हणाल्या, कोकणातील जनता शरदचंद्र पवार यांच्यासोबत आहे. महिला, युवतींची मोठी साथ कोकणातून मिळत आहे. बळीराजाची साथ आपल्यासोबत आहे. त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळात शरद पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात कोकणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अग्रस्थानी राहील. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा निवडणुकांत कोकणातून राष्ट्रवादीच्या विजयाची तुतारी फुंकली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादीच्या आयोजित बैठकीत अर्चना घारे बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, महिला प्रदेशाध्यक्षा अँड. रोहिणी खडसे, सिंधुदुर्ग जिल्हा महिला अध्यक्षा अँड. रेवती राणे, प्रदेश उपाध्यक्षा सौ.नम्रता कुबल यांच्यासह कोकण विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.