
बांदा : गेली २० वर्ष भाजपमध्ये काम करत असून माझं कुटुंब गेली कित्येक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत आहे. या कुटुंबावर पक्षानं विश्वास दाखवत प्रभाग क्रमांक ५ मध्ये मला उमेदवारी दिली आहे. गेली अनेक वर्षे जनसेवेत आमचं कुटुंब कार्यरत असून हाच वारसा पुढे नेत, जनतेसाठी काम करण्याची माझी इच्छा आहे. सबका साथ, सबका विकासचा नारा भाजपने देशात दिला असून माझे मतदार मला नक्कीच त्यांच नेतृत्व करण्यासाठी प्रभाग क्रमांक ५ मधून भरघोस मतांनी विजयी करतील असा दावा बांदा नागरी विकास आघाडीच्या उमेदवार सौ. रूपाली सुधीर शिरसाट यांनी केला आहे.
त्या म्हणाल्या, बांदा गावात भाजप मार्फत काम करत आहे. महिलांच्या प्रश्नांसह सार्वजनिक,
सांस्कृतिक क्षेत्रात मी कार्यरत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच रिंगणात असून प्रचारा दरम्यान चांगला प्रतिसाद जनतेतून मिळत आहे. मला नक्की खात्री आहे, माझी जनता मला सदस्य म्हणून निवडून देईल.