जानवलीत अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: May 17, 2024 05:29 AM
views 791  views

कणकवली :  महामार्गावर जानवली प्राथमिक शाळेसमोर चालत असलेल्या पादचाऱ्याला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली या धडकेत ते जागीच गतप्राण झाले. वाहनाची धडक एवढी भयानक होती की त्या वाहनाच्या पुढील बाजूस चा बंपर तुटून पडला. व्यक्तीची ओळख पटली नसून ही व्यक्ती मजुरीचे काम करण्यासाठी जात असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले.

ज्या गाडीने धडक दिली ती कार प्रवाशांची वाहतूक करणारी पिवळी नंबर प्लेट असलेली आहे. ही कार गोव्याकडे भरधाव वेगाने गेलेले समजत असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.