काजू बी ला प्रतिकीलो २०० रुपये भाव द्या..!

सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन
Edited by: भगवान शेलटे
Published on: February 16, 2024 06:23 AM
views 279  views

सावंतवाडी : काजू बी ला प्रतिकीलो २०० रुपये भाव मिळाला पाहिजे म्हणून बागायतदार शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनात तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सामील झाले आहे. या आंदोलनाला सर्वच स्तरातून पाठींबा मिळत आहे. 

सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी एकत्र येऊन काजुला हमीभाव मिळवून देण्यासाठी लढा देण्याचे ठरविले असून त्याची रूपरेषा तयार केलेली आहे. त्याप्रमाणे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार ऑफिस समोर एकाच दिवशी सर्व जिल्ह्यात धरणे आंदोलन कार्यक्रम, लोकप्रतिनिधींची संपर्क साधून योग्य न्याय न मिळाल्यास ताबडतोब लाक्षणिक उपोषण व त्यानंतरही दखल न घेतली गेल्यास आमरण उपोषण हे पर्याय यावेळी निवडले गेलेले आहेत. 

या आंदोलनात विलास सावंत, सुरेश गावडे, लखमराजे भोसले, गुरुनाथ पेडणेकर, मधुकर देसाई, नितीन मावळंकर, प्रवीण देसाई, जगदेव गवस, प्रकाश वालावलकर, बाळा परब, प्रदीप सावंत, लक्ष्मण निगुडकर, गुरुदास गवंडे आदी सहभागी झाले आहेत.