तळकोकणात पवारांचा, पवारांना धक्का !

Edited by: विनायक गांवस
Published on: October 20, 2024 14:18 PM
views 250  views

सावंतवाडी : सावंतवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विधानसभा प्रमुखांची बैठक झाली. यावेळी शरद पवार यांच्यासह असलेल्या आगस्तिन फर्नांडिस, अॅंथोनी डिकुव्हा, अलेक झांडर, स्टॅंडी डिकुव्हा, लुईस डिसोझा आदींनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची बैठक यावेळी पार पडली. पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या भावना समजून घेण्यासाठी या बैठकीच आयोजन करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या बैठकीत शरद पवार यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांची साथ दिली. विधानसभा मतदारसंघात महायुतीत असलेल्या संघर्षात राष्ट्रवादीला हा फटका बसला आहे.यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुरेश गवस, एम के गावडे, तालुकाध्यक्ष उदय भोसले, सत्यवान गवस, संदिप पेडणेकर, एम डी सावंत, अशोक पवार, सत्यजित धारणकर आदी उपस्थित होते.