माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते पवारांनी कोकणात घडवले | प्रवीण भोसले भावनिक

Edited by: विनायक गावस
Published on: July 11, 2023 15:20 PM
views 107  views

सिंधुदुर्ग : राष्ट्रवादीतील अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार यांचे कट्टर समर्थक, फायरब्रॅण्ड नेते, विरोधीपक्षनेते जितेंद्र आव्हाड यांची सावंतवाडी संस्थान मराठा समाज हॉल कुडाळमध्ये सभा होत आहे. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील महत्त्वाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित आहेत. 

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले, ९० सालात मी पहिल्यांदा विधानसभेत गेलो. तेव्हा मुख्यमंत्री शरद पवार होते. तेव्हापासून आजतागायत शरद पवार यांनी कोकणवर प्रेम केलय. माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते कोकणात घडवले. दीपक केसरकर सारख्यांना संधी दिली. आज आहेत कुठे ? राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेले. तिकडून शिंदेंकडे गेले. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर मागू़न धावत आहेत. शिंदे घसरले अजित पवार बसले तर वर्णी लावण्यासाठी दीपक केसरकर धडपडत आहेत. सुनिल तटकरे, उदय सामंत, शेखर निकम यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. राष्ट्रवादीचा वाघ जितेंद्र आव्हाड महाराष्ट्रात फिरत आहे. आपल्या दौऱ्याची सुरुवात त्यांनी केलीय. जे गेले ते गेले, नव्यानं शरद पवारांचा पक्ष उभा करूया अस आवाहन त्यांनी केले.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, व्हिक्टर डांन्टस, प्रसाद रेगे, शेखर माने आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.