ऑर्थोपेडिक कॅम्पचा रुग्णांनी लाभ घ्यावा | दीपक केसरकर मित्रमंडळाच आवाहन

Edited by: विनायक गावस
Published on: July 13, 2023 20:18 PM
views 159  views

सावंतवाडी : शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेना सावंतवाडी आणि दिपक केसरकर मित्रमंडळाच्यावतीने मोफत अस्थिरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमान्य हॉस्पिटल पुणे यांच्या सौजन्याने आंतरराष्ट्रीय अस्थिरोग तज्ञांकडून ही तपासणी करण्यात येणार आहे. शिरोडा (१८ जुलै), वेंगुर्ले (१९ जुलै), दोडामार्ग (२० जुलै), साटेली-भेडशी (२१ जुलै), बांदा (२२ जुलै) आणि सावंतवाडी (२३ जुलै) या ठिकाणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. याचा सर्व रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे. अधिक माहितीसाठी राजेंद्र पोकळे (9579463526), नितीन मांजरेकर (9922540454), गणेशप्रसाद गवस (9403367863), नारायण राणे (9421084134), गजानन नाटेकर (9422596235) यांच्याशी संपर्क करावा.