
कुडाळ : कुडाळ तालुक्याच्या ठिकाणी महिला व बाल रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. रुग्णालयात बरेच सुविधा आहेत मात्र तज्ञांभावी त्या पुरवणे शक्य होत नाही. सोनोग्राफी मशीन सोनोग्राफीची मशीन उपलब्ध असून देखील तिचा फायदा पेशंटला होत नाही, अशी माहिती समोर येतेय.
ती ऑपरेट करण्यासाठी तज्ञ डॉक्टर लागतात आणि तज्ज्ञांचा अभाव या रुग्णालयामध्ये आहे. गर्भवती महिलांना सोनोग्राफीसाठी पाटील हॉस्पिटल येथे पाठवण्यात येते. त्यांचा खर्च मातृ संरक्षण अंतर्गत 400/- रुपये इतका एस एस के योजनेतून हॉस्पिटलमधून दिला जातो. अत्यंत कमी खर्चामध्ये तिथे सोनोग्राफी केली जाते. सद्यस्थितीमध्ये दोन स्त्री रोग तज्ञ हॉस्पिटल साठी रुजू झाले आहेत यांची नोंदणी चालू आहे. ही नोंदणी झाल्यानंतर ही मशीन वापरात घेतली जाणार आहे.
तसेच सध्या गर्भवती महिलांना केवळ सोनोग्राफी बाहेर नेऊन करण्याचा फायदा दिला जात आहे. इतर रुग्णांना या सुविधेचा लाभ घेता येणार नाही. वरिष्ठांशी पत्रव्यवहार झालेला असून लवकरच या सुविधा सुरू करण्यात येतील. रेडिओलॉजिस्ट अभावी ही सुविधा सोनोग्राफीची जनरल पेशंटला देण्यात येणार नाही त्यामुळे जनरल पेशंटला या रुग्णालयाला रेडिओलॉजिस्ट मिळेपर्यंत थांबावे लागणार आहे किंवा इतर पर्यायाचा वापर करावा लागणार आहे.