'पटेकर्स फ्रेश मार्ट'च उद्या ग्रॅण्ड ओपनिंग !

एकाच छताखाली बरंच काही !
Edited by: विनायक गांवस
Published on: May 24, 2023 22:40 PM
views 247  views

सावंतवाडी : शहरातील पटेकर बंधूंचा ड्रिम प्रोजेक्ट असणाऱ्या 'पटेकर्स फ्रेश मार्ट' चा गुरुवारी २५ मे रोजी सकाळी १०.२३ वा. शानदार शुभारंभ होत आहे. गणेश प्लाझा, विठ्ठल मंदिर रोड, कलावती आई मंदिर समोर, जुनाबाजार येथे हे 'पटेकर्स फ्रेश मार्ट' ग्राहकांच्या सेवेत रूजू होत आहे. बाजारभाव आणि ऑनलाईपेक्षा कमी किंमतीत येथे सर्व वस्तू उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या शुभप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन पटेकर्स फ्रेश स्मार्टचे संचालक महेंद्र पटेकर, दीपक पटेकर, सौ. भूमी पटेकर आणि पटेकर कुटुंबियांकडून करण्यात आले आहे.


या मार्टमध्ये रोजच्या गृहपयोगी वस्तू, बेकरी प्रोडक्ट, सौंदर्य प्रसाधने, मसाले, कडधान्य यासह आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, गिफ्ट आयटम, ब्रँण्डेड सॅक, बेडशीट, कपडे, बेबी टॉईस यासारख्या अनेक वस्तू माफक दरात एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना ऑनलाईनपेक्षा स्वस्त वस्तू येथे उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. उद्घाटना निमीत्त विविध उत्पादनांवर स्पेशल डिस्काउंट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नव्यानं सुरु होणाऱ्या या 'पटेकर्स फ्रेश मार्ट'ला एकदा अवश्य भेट द्या अन् मनमुराद खरेदी करा असं आवाहन पटेकर कुटुंबियांनी केलय.