
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये योग प्रसाराचे कार्य खूप मोठ्या वेगाने चालू आहे. सध्या कुडाळ येथे सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिर चालू आहे. शंख प्रक्षालन, त्राटक, जलनिती, सूत्रनिती, नस्यनीती, नेत्रनिती, वमन क्रिया, ॲक्युप्रेशर, योग, सूर्यनमस्कार, प्राणायाम यासारख्या अनेक उपयुक्त अशा योगक्रियांचे प्रशिक्षण तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मिळत आहे. या योगाभ्यासातील महत्वाचा घटक असलेला होमहवन, यज्ञ प्रशिक्षण हा कार्यक्रम आज गुरुवार दि 20 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 5:30 वाजता योगवर्गात घेण्यात आला. त्यावेळी प्रज्वलित केलेली हवनकुंडे आणि मंत्रोच्चारामुळे वातावरण अत्यंत प्रसन्न वाटत होते.
या शिबिरामध्ये पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग चे जिल्हाप्रभारी श्री शेखर बांदेकर यांच्या मार्फत सर्व शिबिरार्थ्यांना होमहवन ( यज्ञ ) प्रशिक्षण देण्यात आले. कुडाळ मधील श्री. प्रशांत केरवडेकर, विलास परब, विणा परब, ज्योती प्रभू ,जगन्नाथ प्रभू , गायत्री सरंगले, प्रदीप पेडणेकर, शिल्पा पडते, श्रीतेज कावले, वैभवी कावले, प्रभू पंचलिंग , जनार्दन पवार, जयवंती पवार, संजना किनळेकर, सुधीर सावंत, रामचंद्र राणे, यशवंत नाईक, निशिगंधा कोरगावकर, चंद्रशेखर नाईक, सुरेश चव्हाण, वीणा परब, विलास परब , यशवंत आरोसकर, योगिता आरोसकर, तेजश्री परब, राजेंद्र मुळीक, संदीप माळकर , सुप्रिया पावसकर, शारदा वजराटकर, मानसी कुंभार, अलिषा वेतुरेकर, सुहास दळवी यांनी होमहवन प्रात्यक्षिक करून प्रशिक्षण घेतले.