
कणकवली :कणकवली तालुक्यात नेहमीच सीएनजी गॅस चा तुटवडा असतो कणकवली तालुक्यातील काही मोजकेच सीएनजी पेट्रोल पंप आहेत. त्यातील फोंडाघाट येथील पंपावर सीएनजी भरण्यासाठी रिक्षा चालकांनी सकाळी पाच वाजल्यापासून रांगा लावल्या होत्या. पण सायंकाळपर्यंत सीएनजी उपलब्ध झाला नाही त्यामुळे रिक्षाचालक आणि कारचालक सर्वच प्रवाशांनी पंपावर मोठा गदारोळ केला. दिवसातून एकदा सीएनजी गॅस ची गाडी येते पण तीहि वेळेवर येत नाही. आणि काही तासातच तो सीएनजी संपतो त्यामुळे सध्याच्या दिवसात व्यवसाय करणारे रिक्षा चालक तसेच कारचालक हे सीएनजी भरण्यासाठी दिवसभर लाईन मध्ये उभे राहून देखील त्यांना गॅस मिळत नसल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी कणकवली तालुक्यातील सीएनजी गॅस पंपा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करून या प्रवाशांची गैरसोय टाळावी अन्यथा रोज अशा प्रकारचे मोठे गदारोळ आपल्याला पाहायला मिळतील.