
बांदा : निगुडे - तेलवाडी येथील रहिवासी भगवान तुळसकर यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. वयाच्या सुमारे ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मन मिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित होते.
त्यांच्या निधनाने एक हसरे, मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व गेल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात्य एक मुलगा, २ मुली, २ भाऊ, बहिणी, नातवंडे असा परिवार आहे.