
सावंतवाडी : राज्यात मंत्रिमंडळ विस्तारावरुन रात्रीच्या वेळी होणाऱ्या बैठका पाहता स्थानिक आमदार दीपक केसरकर यांचे मंत्रीपद टिकेल का ? की ते भाजपमध्ये जातील असा सवाल ठाकरे शिवसेनेचे प्रवक्त डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे. परुळेकर यांनी यासंदर्भात पत्रक प्रसिद्ध दिले त्यात म्हटले.
की, राज्यात मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू आहेत. आता विस्तार करताना त्या ठिकाणी शिंदे गटातील मंत्र्यांना बाजूला करुन त्या ठिकाणी अजित पवारांच्या सोबत असलेल्या आमदारांना मंत्रीपदे द्यावीत, असा विचार सुरू आहे. त्यावरुन शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे आयत्यावेळी असे झाल्यास केसरकर यांच्याकडे असलेले मंत्रीपद राहील का...? हा प्रश्न आहे तर दुसरीकडे तर रविंद्र चव्हाण यांच्याकडे दोन पालकमंत्री पदे आहेत. त्यामुळे त्यांना अन्य ठिकाणची जबाबदारी दिल्यास जिल्ह्याला नवा पालकमंत्री मिळेल का...? असा ही सवाल त्यांनी केला आहे. आता राज्यात सुरू असलेल्या सत्तातरांच्या नाट्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा सर्व प्रकार म्हणजे सर्कस असल्याचे त्यांचे म्हणणे असून हायजॅक ड्रामा जास्त काळ चालणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.