परुळेबाजार ग्रामपंचायतीचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

Edited by: दिपेश परब
Published on: September 11, 2023 20:09 PM
views 54  views

वेंगुर्ला : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामपंचायत २०२३ अंतर्गत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत विभागात द्वितीय तसेच जिल्हास्तरावर प्रथम अशी निवड झालेल्या परुळे बाजार ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांच्या सत्कार पालकमंत्री रविद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत १० सप्टेंबर रोजी ओरोस शरद कृषी भवन येथे संपन्न झाला.

यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, पोलीस अधीक्षक श्री.अग्रवाल यांच्यासह परुळेबाजार ग्रामपंचायतीचे सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दूधवडकर, माजी सरपंच श्वेता चव्हाण, प्रदिप प्रभू, ग्रामसेवक शरद शिंदे, सदस्य प्राजक्ता पाटकर, सुनाद  राऊळ, तन्वी दूधवडकर, सीमा सावंत, नमिता परुळेकर, माजी सदस्य सुनील चव्हाण, ग्रामपंचायत पुरस्कार कर्मचारी  शंकर घोगळे, भूषण मेस्त्री तसेच प्रसाद पाटकर उपस्थित होते.