स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत केंद्रीय समितीकडून परूळे बाजारचे मुल्यमापन..!

Edited by: दिपेश परब
Published on: August 25, 2023 20:22 PM
views 167  views

वेंगुर्ले : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ अंतर्गत केंद्रस्तरीय समितीने  परुळेबाजार ग्रामपंचायतीला भेट देऊन मुल्यमापन केले आणि विविध स्वच्छता विषयक उपक्रमांची पाहणी केली.

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ अंतर्गत  परुळेबाजार ग्रामपंचायतीसह जिल्ह्यातील आणखी तीन ग्रामपंचायतींची राज्यस्तरावरून केंद्रस्तरावर निवड झाली. त्या अनुषंगाने केंद्रस्तरीय समिती मुल्यमापनासाठी परुळेबाजार येथे दाखल झाले. या समितीत अभय यादव, कमलाशंकर यादव यांचा समावेश होता. यावेळी जिल्हा स्वच्छता कक्षाचे निलेश मठकर, पंचायत समिती वेंगुर्ल्याच्या अक्षता नाईक आदी उपस्थित होते.

यावेळी सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय  दूधवडकर, ग्रामपंचायत सदस्य प्रदिप प्रभू, अभय परुळेकर, सुनाद राऊळ, सीमा सावंत, नमिता परुळेकर, तन्वी दुधवडकर, पुनम परुळकर, प्राजक्ता पाटकर, प्रसाद पाटकर, सुधीर पेडणेकर, प्राजक्ता चिपकर, ग्रामसेवक शरद शिंदे यांसह ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, आशा, आरोग्य कर्मचारी, शिक्षकवर्ग उपस्थित होते. यावेळी स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण २०२३ अनुषंगाने समिती अधिका-यांनी ऑनलाईनपद्धतीने प्रश्नांची उत्तरे संबंधीत विभागाच्या साईटला पाठविण्यात ऑनलाईन पद्धतीने समितीने प्रत्येक स्वच्छते विषयक उपक्रमाची बारकाईने माहिती घेतली.