चव्हाण, केसरकरांवर पक्षाची जबाबदारी..?

मंत्रिमंडळात समावेश होणार ?
Edited by:
Published on: December 15, 2024 12:29 PM
views 1113  views

सावंतवाडी : सिंधुदुर्गचे पालकमंत्री, कॅबिनेट मंत्री  रविंद्र चव्हाण व सावंतवाडी आमदार, कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांचा महायुतीच्या मंत्रिमंडळात समावेश असणार का ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. अद्यापपर्यंत ही दोन्ही नाव यादीत नसल्याचे वृत्त समोर येत आहे‌. दोघांनाही पक्षाची मोठी जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा आहे.

सरकारच्या नव्या मंत्री मंडळात अनेक नव्या चेह-यांना संधी देण्यात आली आहे. कोकणातील नितेश राणे, योगेश कदम, भरत गोगावले या नव्या चेहऱ्यांना संधी मिळाल्याच दिसत आहे. उदय सामंत, आदिती तटकरे या जुन्या मंत्र्यांना पुन्हा संधी मिळणार असल्याचे वृत्त असून कॅबिनेट मंत्री राहिलेले रविंद्र चव्हाण व दीपक केसरकर यांचा मंत्रिमंडळात समावेश असणार का ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. अद्याप या नेत्यांची नावं समोर आलेली दिसत नाही आहेत.

नव्याना संधी दिल्याने जुन्यांचे पुर्नवसन केले जाणार असल्याचे समजत आहे. रवींद्र चव्हाण यांना मंत्री पदाऐवजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद दिले जाणार असल्याची शक्यता आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रीपद देऊन पक्षाची जबाबदारी श्री. चव्हाण यांच्याकडे दिली जाणार आहे. तर शिवसेनेकडून दीपक केसरकर यांनाही मोठी जबाबदारी देण्याच्या माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असणाऱ्या केसरकरांचा मान राखला जाणार असल्याचे बोलले जात आहे. कोकणची जबाबदारी द्या असं केसरकरांकडूनही सांगण्यात आलं होतं. यातच आता पर्यटन खात शिवसेनेच्या वाट्याला अल्याच वृत्त असल्याने पर्यटन जिल्ह्यासह कोकणच्या हिताचं हे खात शिवसेनेच्या कोणत्या चेहऱ्याकडे जात हे देखील महत्वाचे ठरणार आहे.