
देवगड : ग्रामीण भागात स्वच्छतेची चळवळ अधिक प्रभावी करण्यासाठी १ मे २०२५ पासुन देवगड तालुक्यात कंपोस्टखड्डा भरू , आपल गांव स्वच्छ ठेवु हे विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असुन या अभियानात सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे असे आवाहन गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांनी टेबवली कालवी येथील कपोस्ट खड्डा भरा अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी केले.
टेंबवली कालवी येथे कंपोस्ट खड्डा भरू , आपल गाव स्वच्छ ठेवू या मोहिमेचा शुभारंभ गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांच्या हस्ते झाला . यावेळी टेंबवली सरंपच हेमंत राणे, ग्रामपंचायत सदस्य शेखर धुरी , ग्रामपंचायत अधिकारी हनुमंत तेर्से , तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश सागवेकर , पोलीस पाटील अमोल जाधव, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष संतोष बाणे , पूजा शिंदे , रेश्मी राणे , प्रिया मांडवकर , पुजा घाडी , शिक्षक वर्षाराणी कर्ले, अमोल केदार , अनघा येरागी , नेहा वायंगणकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शाळेतील मुलांना गुणपत्रक वाटप करण्यात आली. तसेच जि. प. शाळा टेंबवली कालवी शाळेचा चावडी वाचन उपक्रम संपन्न झाला.
कंपोस्ट खड्डा भरू, आपल गांव स्वच्छ ठेवु या अभियानाबाबत माहिती देताना गटविकास अधिकारी वृक्षाली यादव म्हणाल्या कि सांडपाणी घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत वैयक्तिक शोषखड्डे , सार्व. शोषखड्डे तसेच परसबाग व घनकचरा व्यवस्थापनासाठी गांडुळ खत प्रकल्प ,खत खड्डे , नाडेफ खड्डे , प्लास्टीक कचरा संकलन केंद्र इत्यादी उपाययोजना केल्या जात आहेत . राज्यस्तरीय पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या दिलेल्या निर्देशानुसार , गावात तयार केलेल्या नाडेपच्या माध्यमातुन ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करून खतनिर्मितीवर लक्ष केंद्रित केले जाणार असुन हे अभियान १ मे ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत राबवण्यात येणार असल्याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार शिक्षक अमोल केदार सर यांनी मानले.