दीपोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हा

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचं आवाहन
Edited by:
Published on: November 21, 2023 15:00 PM
views 94  views

सावंतवाडी : रविवार दिनांक २६ नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमा आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने शहरातील प्रत्येक मंदिरामध्ये दीपोत्सव होणार आहे. शहरातील महिला भगिनींना पाच तरी पणत्या आपल्या जवळच्या मंदिरामध्ये लावून दीपोत्सवात सहभागी होण्याच आवाहन  साळगावकर यांनी केल आहे.

गेल्यावर्षी या उपक्रमात मोठ्या संख्येने यात महिलांनी सहभाग घेतला होता. तसेच मंदिरांनी सुद्धा यात सहभाग घेतल्याने शहरातील सर्व मंदिरे उजळून निघाली होती. यावर्षी सुद्धा दीपोत्सवामध्ये शहरातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केल आहे.