स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी व्हा

विस्तार अधिकारी दीपक तेंडुलकरांचं आवाहन
Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 26, 2025 17:17 PM
views 119  views

देवगड : स्वच्छ भारत मिशनच्या दुसर्‍या टप्प्यांतर्गत केंद्र शासनाने ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025’ सुरू झाले असुन या सर्वेक्षण अंतर्गत जिल्हातील जास्तीत जास्त लोकांनी अभिप्राय नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी देवगड तालुक्यातील  नागरीकांनी पुढाकार घेवून स्वच्छ सर्वेक्षण ग्रामिण २०२५ ( SSG 2025 ) हे अॅप डाऊनलोड करून अभिप्राय देत असुन सिनियर कॉलेज मधील युवक युवतींमध्ये स्वच्छ सर्वेक्षण बाबत प्रचार प्रसिद्धी व्हावी या उद्देशाने विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभाग देवगड दीपक तेंडुलकर यांनी सदाशिव हरी केळकर महाविदयालय देवगड येथे मार्गदर्शन केले. यावेळी पंचायत समिती देवगड गटसमन्वयक वैशाली मेस्त्री, पाणी गुणवत्ता तज्ञ हर्षदा बोथीकर, कनिष्ठ अभियंता प्रज्ञा पोवार, डाटा ऑपरेटर मोहिनी खडपकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण गुणांकन पद्धत ( एकुन  १००० गुण ) असुन ग्रामस्थांच्या प्रतिसादासाठी १०० गुण असुन सिंधुदूर्ग जिल्हा स्वच्छ सर्वेक्षण २०२५ मध्ये अग्रेसर राहण्यासाठी ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025’ अंतर्गत देवगड तालुक्यातील जास्तीत जास्त नागरीकांनी अभिप्राय नोंदणी करावी असे आवाहनही विस्तार अधिकारी ग्रामपंचायत दीपक तेंडुलकर यांनी केले.