
पेडणे : पेडणे मालपे येथील भिंतीचा काही भाग कोसळला. इथून जाणारी कार थोडक्यात वाचली. हायवेच्या दोन्ही बाजूने मोठा मातीचा डोंगर असल्याने अशीच घटना घडण्याची भीती व्यक्त होतेय.
मुंबई गोवा हायवेचं 2023 मध्ये डोंगर पोकरून नवीन काम करण्यात आले होते. दोन्ही बाजूने उंच डोंगर असल्याने बाजूने संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. मात्र या भिंतीचा काही भाग कोसळला. दरम्यान, गोव्याच्या दिशेने जाणारी अल्टो कार बाल बाल बचावली. यापुढे मोठ्या पावसात या हायवेवरील डोंगर कोसळून हा हायवे वाहतुकीस बंद होण्याची शक्यता वर्तविली जातेय.