
सावंतवाडी : शहरात वाढती पार्किंग समस्या असल्यामुळे न.प. प्रशासनाने ठिकठिकाणी नो पार्किंगचे फलक लावले आहेत. मात्र, वाहनधारकांकडून नो पार्किंगच्या फलकासमोरच पार्किंग करत नियम धाब्यावर बसवले जात आहेत. याबाबत येथील व्यावसायिक, नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
बेळगाव- सावंतवाडी रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात रहदारी आहे. पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक येऊ लागले आहेत. मात्र, या रस्त्यावर लावल्या जाणाऱ्या दुचाकी वाहतूकींना अडथळा निर्माण करत आहेत. चक्क नो पार्किंग असा फलक असताना गेटसमोर वाहने उभी केल्यास कारवाईची तंबी दिलेली असाताना देखील त्याच फलकासमोर गाड्या पार्क केल्या जात आहेत. याबाबत येथील व्यावसायिक, नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासनानं यात लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केली आहे. जेणेकरून येथून ये-जा करणारे पर्यटक, शहरवासीयांंना ट्राफिक जामचा मनस्ताप सहन करावा लागणार नाही.