
सावंतवाडी : परीट समाजाचे "महा अधिवेशन " शिर्डी येथे रविवार 9 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाच्या वतीने सप्तपदी लॉन्स शिर्डी साईनगर रेल्वे स्टेशन गेट जवळ शिर्डी कोपरगाव रोड तालुका राहाता जिल्हा अहिल्यानगर महाराष्ट्र येथे संपन्न होणार आहे.
या महा अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री पालकमंत्री अहिल्यानगर जिल्हा राधाकृष्ण विखे पाटील,खास. रवींद्र वायकर, खास. भाऊसाहेबजी वाकचौर, कृष्ण कुमार कनौजिया राष्ट्रीय अध्यक्ष परीट समाज, एकनाथराव बोरसे राष्ट्रीय उपाध्यक्ष परीट समाज, राजेंद्र खैरनार प्रदेश अध्यक्ष परीट समाज, सीमाताई रंधे महिला प्रदेशाध्यक्ष, सुषमाताई अमृतकर कार्याध्यक्ष महिला परीट समाज, संतोष भालेकर राष्ट्रीय उपाध्यक्ष परीट समाज, खंडेराव कडलग स्वागताध्यक्ष, सुनील फंड जिल्हाध्यक्ष व निमंत्रक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत परीट समाजाचे महा अधिवेशन शिर्डी येथे संपन्न होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व परीट समाजातील बंधू भगिनींनी शिर्डी येथील महा अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांनी केले आहे.