
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते परशुराम उपरकर यांना मनसेतून काढल्याची माहिती मिळते. त्याबाबतचं पत्र मनसेच्या अधिकृत पेजवरून जाहीर करण्यात आलंय. उपरकर यांनाही हे पत्र प्राप्त झाल्याची माहिती मिळतेय. गेल्या काही दिवसांपासून मनसेत सुरु असलेल्या राजीनामा सत्रानंतर आणखीन एक मोठा नेता बाहेर गेलाय.