
कणकवली : मालवण येथे झालेल्या नौसेना दिनाकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे बांधकाम दुरूस्ती, हेलीपॅड बांधणे, चबुतरा बांधणे व इतर कामे करण्यात आली आहेत. त्यामध्ये तंत्रनिकेतन कॉलेज येथे तात्पुरते हेलीपॅड तयार करण्यासाठी ९३ लाख ७६ हजार ५९२ रू. निधी खर्च केलेला आहे. त्या कामांचे अंदाजपत्रक द्या अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर व मनसेच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आजयकुमार सर्वगोड यांच्याकडे केली आहे. अंदाजपत्रके मिळेपर्यंत कार्यालयातून बाहेर जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. यावेळी विनोद तांडव, अमित इब्रामपूरकर, संदीप लाड व इतर तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी यावेळी अजयकुमार सर्वगोड यांनी अंदाजपत्रकाची माहिती गुरुवारपर्यंत देण्याचे मान्य केले.