
मुंबई : मुंबई गोवा महामार्गावरून गोव्याहून सुटणाऱ्या खाजगी गाड्यांमधून आंब्यासाह इतर सर्व माल वाहतूक केली जाते. याचबरोबर या गाड्यांमधून अमली पदार्थांचीही वाहतूक केली जात असल्याचा आरोप परशुराम उपरकर यांनी केलाय. यामुळे महाराष्ट्राचा महसूल बुडत आहे. यांसह १७ विविध मागण्यांसाठी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गनगरी येथील आरटीओ अधिकाऱ्यांसमोर आंदोलन सुरू केले आहे. यावेळी उपरकर यांनी आरटीओ आधिकाऱ्यांना धारेवर धरले.