
रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात कंटेनर, आयशर टेम्पो आणि घरडा कंपनीची शिपची बस यांच्यात विचित्र तिहेरी अपघात घडला. कंटेनर लोटे परशुराममधील घरडा कंंपनीच्या कामगारांना घेऊन जाणार्या शीपच्या बसवर आदळून पलटी झाला. यावेळी कंटेनर व बस सरकत आल्यानं पाठीमागे असलेल्या वॅगनार कारचे नुकसान झालं.
या अपघातातील जखमींची संख्या वाढली. 10 जण जखमी झालेत. लाईफ केअर, परशुराम हॉस्पिटल व घरडा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे परशुराम घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. हा घाट वाहतुकीसाठी असुरक्षित बनलाय.