
वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री नितेश राणे यांची भाजपा वेंगुर्ले तालुका अध्यक्षपदी निवड झालेल्या विष्णू उर्फ पपू परब यांनी भेट घेतली. यावेळी मंत्री नितेश राणे यांनी परब यांना शुभेच्छा देताना तालुक्यात भाजपा पक्ष अजून मजबूत करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करा असे सांगितले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, परबवाडा ग्रामपंचायत सदस्य संतोष सावंत तसेच सायमन आल्मेडा, मारुती दोडशनट्टी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.